जामखेड
प्रबोधन करण्यासाठी कीर्तनाचे मोठे योगदान आहे. कीर्तनाच्या माध्यमातून अनेक सामाजिक, पर्यावरणविषयक प्रबोधनाचे कार्यक्रम होऊन समाजात जनजागृती झाली आहे,बापुसाहेब कार्ले यांनी अन्नदान बरोबरच ज्ञानदान करण्याचे काम केले हे निश्चितच कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन बारामती ऍग्रोच्या विश्वस्त सुनंदाताई पवार यांनी केले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषिमंत्री शरदचंद्र पवार यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्ताने राष्ट्रवादीचे खांदे समर्थक व कुसडगावचे माजी सरपंच बापूसाहेब कार्ले यांच्या पुढाकारातून खांडवी येथे कीर्तनकार ह भ प राजेंद्र महाराज जमदाडे यांच्या भव्य कीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते .यावेळी आ रोहित पवार यांच्या मातोश्री सुनंदाताई पवार यांनी उपस्थित राहून कीर्तन सोहळ्याचा आनंद घेतला. यावेळी कीर्तनकार ह भ प राजेंद्र महाराज जमदाडे यांच्या कीर्तनानंतर महाप्रसादाचे भाविक भक्तांनी लाभ घेतला.यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विजयसिंह गोलेकर,राजेंद्र पवार ,संजय वराट रामहरी गोपाळघरे ,नरेंद्र जाधव, बबन तुपेरे ,हनुमंत भोसले ,सचिन भोसले, दीपक नेटके, गोकुळ नेटके ,प्रदीप धुमाळ ,बप्पू वळुंजकर, डॉक्टर हजारे ,अरुण गाड ,संतोष ढवळे ,निलेश पवार ,राहुल कवादे, उपस्थित होते,
यावेळी बोलताना बारामती ऍग्रोच्या विश्वस्त सुनंदाताई पवार म्हणाल्या कि, या राज्याला राजश्री छत्रपती शिवाजी महाराज व संत तुकोबा महाराज यांच्या विचारांची गरज असून समाजप्रबोधनात्मक कीर्तनाची आज समाजाला नितांत गरज आहे. अशा प्रकारची कीर्तनातून समाजाला दिशा देण्याचे काम निश्चितच होईल,रोहित दादांच्या वाढदिवसानिमित्ताने बापूसाहेब कार्ले यांच्या माध्यमातून ४१ जिल्हा परिषद शाळेतील विध्यार्थ्यांना सुमारे अडीच हजार जेवणाचे डब्बे वाटप करण्यात आले माजी केन्द्रीय मंत्री शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसांनिमित्ताने कीर्तन सोहळा आयोजित केला अन्नदानबरोबरच ज्ञानदान करण्याचे काम केले हे निश्चितच कौतुकास्पद आहे
